मोदीजी, करून दाखवा

सारा देश तुमच्या पाठिशी आहे

491999-pm-modi-addresses-nation-on-independence-day-afp

कालपासून मन अस्वस्थ आहे. प्रचंड मानसिक त्रास होतोय. जम्मू-काश्मीरमधील उरी इथं लष्कराच्या तळावर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांकडून हल्ला होतो आणि त्यात भारताच्या एक-दोन नव्हे तर तब्बल १७ जवानांना वीरगती प्राप्त होते… हे सर्व जवान ‘ड्युटी’ संपवून आराम करण्यासाठी तळावर आलेले. तात्पुरत्या उभारलेल्या तंबूमध्ये ते विश्रांती घेत होते. स्फोटांनंतर हे तंबू देखील पेटतात काय आणि अवघ्या तीन मिनिटांमध्ये होत्याचं नव्हतं होतं काय. सारंच अनाकलनीय. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सतरा पैकी चौदा जवान आगीच्या तडाख्यात सापडले नि झोपेमध्येच त्यांना मृत्युने कवटाळले… हा सर्व घटनाक्रम कानावर आल्यापासून खूप खिन्न वाटतंय… मला वाटतं प्रत्येक देशभक्त भारतीयाची अवस्था माझ्यासारखीच झाली असावी. खोलवर कुठेतरी जखम झाल्यासारखी परिस्थिती आहे.

प्रत्येक वेळी पाकिस्तान कोणत्या ना कोणत्या मार्गाने येतो आणि भारताची कुरापत काढून निघून जातो. कधी त्यांचे सैनिक येतात. कधी त्यांच्या सैनिकांच्या गणवेशातील अतिरेकी. तर कधी अतिरेकी उघडपणे येऊन भारतीय तळांवर हल्ले करण्याचा प्रयत्न करतात. दुःख याचं आहे, की भारतात सध्या नरेंद्र मोदी यांचे सरकार असूनही अशा हल्ल्यांना प्रतिबंध झालेला नाही. मोदीजी, तुमच्याकडून देशवासियांना खूप अपेक्षा आहेत. त्यांना कठोर कारवाईचा दाखला द्या…

18jk3

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ कालपासून व्हायरल झालाय. ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात मोदीजी असं म्हणातात, की पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिले. फक्त निषेधाचे खलिते आणि इशाऱ्यांचे ई-मेल पाठवून काहीही उपयोग नाही. पाकिस्तानला लव्हलेटर पाठविणे बंद केले पाहिजे. ही मुलाखत झाली तेव्हा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नव्हते. फक्त गुजरातचे मुख्यमंत्री होते. मात्र, आता ते भारताचे माननीय पंतप्रधान आहेत. सर्व सत्ता आणि सूत्रे त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांनी फक्त निषेधाचे खलिते पाठवू नये. इशाऱ्यांचे ट्वीट करून शांत बसू नये. पाकिस्तानला असा धडा शिकवा मोदीजी, की पुन्हा त्यांनी आपल्याकडे वाकडा डोळा करून पाहता कामा नये.

(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…)

देशात माननीय अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना पाकिस्तन कुरापती काढायचा. डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या काळातही त्या सुरू होत्या आणि आता केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. कधी गुरुदासपूर तर कधी पठाणकोट. नि आता उरी. २७ जुलै २०१५ रोजी पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात भारतीय जवानांच्या वेषातील दहशतवादी घुसले आणि त्यांनी पोलिस ठाण्यावर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात पोलीस अधिक्षकासह चार पोलिसांना वीरमरण प्राप्त झाले. पठाणकोटचा हल्ला तर आणखीनच भयानक होता. दोन जानेवारी २०१६ रोजी म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीलाच पठाणकोट येथील एअरफोर्स स्टेशनवर दहशतवाद्यांनी हल्लाबोल केला. जवळपास सतरा तास सुरक्षारक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू होती. एकूण सहा जवान या हल्ल्यात हुतात्मा झाले. दोन वर्षांपूर्वी म्हणजे पाच डिसेंबर २०१४ रोजी उरी क्षेत्रातील मोहरा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दहा जवान शहीद झाले होते. या सर्वांवर कडी म्हणजे उरी येथे नुकताच झालेला दहशतवादी हल्ला…

cstfimkviaqfnus

मोदीजी, म्यानमारमध्ये घुसून आपल्या जवानांनी दहशतवाद्यांच्या खात्मा केला होता आणि मणिपूरमधील हल्ल्याचा बदला घेतला होता तेव्हा आम्हाला आपला खूप अभिमान वाटला होता. देशामध्ये खरोखरच बदल झालाय आणि ‘अच्छे दिन’ येण्यास प्रारंभ झालाय, असं वाटायला लागलं होतं. मात्र, असे जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये हल्ले झाल्यानंतर आपले प्रत्युत्तर काहीच नसतं, याची आम्हाला कायमच खंत वाटते. पठाणकोट येथील हल्ल्यानंतर आपले लष्करप्रमुख मा. दलबीरसिंग सुहाग म्हटले होते, की आम्ही कोणत्याही आव्हानासाठी तयार आहोत… म्हणजे काय ते सर्वांनाच चांगले कळते. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरही म्हटले होते, की आम्ही जशास तसे उत्तर देऊ. मागे एकदा ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वाचल्याचं आठवतं. पर्रीकर एका मुलाखतीत म्हणाले होते, की शत्रूकडून कुरापत काढली गेली, तर आमच्या जवानांचे हात बांधून ठेवलेले नाहीत. ते देखील शत्रूला योग्य ते उत्तर देतील. इतकंच काय तर सध्या भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा निवडणुकीपूर्वी म्हणाले होते, की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानी घुसखोर भारतात येण्याची हिंमतही करणार नाहीत. आता या सर्वांनी आपला शब्द खरा करून दाखविण्याची वेळ आली आहे.

पूर्वी मनमोहनसिंग सरकारवर कृतीशून्यतेचा आरोप व्हायचा. पंतप्रधान काहीच बोलत नाहीत आणि कृतीही करत नाहीत, अशी चौफेर टीका व्हायची. आता सरकार बदलले असले, तरीही मोदीजी आपल्याकडून पाकिस्तानला काहीच ठोस उत्तर दिले जात नाही. फक्त आंतरराष्ट्रीय न्यायालयात पुरावे सादर केले जातात. त्याचे पुढे काय होते कोणास ठाऊक? मोदीजी आम्ही आपल्यामध्ये कठोर कारवाई करणारा पंतप्रधान पाहतो. पाकिस्तानला धडा शिकविणारा आणि दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणारा राष्ट्रप्रमुख पाहतो आहोत. गुजरातमध्ये जसे तुम्ही मुख्यमंत्री असताना दहशतवाद्यांनी काणा डोळा करून पाहिला नाही. तशीच परिस्थिती तुम्ही भारताचे पंतप्रधान म्हणून निर्माण करावी, अशी अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून आहे. पाकड्यांना कायमचा धडा शिकवा आणि एकदाचा विषय मिटवून टाका.

modi-sharif-lahore

मध्यंतरी तर तुम्ही कमालच केलीत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवशी तुम्ही थेट पाकिस्तानमध्ये गेलात. शरीफ यांच्या घरी जाऊन त्यांना वाढदिवसाचा केक भरविलात. पण शरीफ हे त्याला जागले नाहीत. तुम्ही पुढे केलेला मैत्रीचा हात त्यांनी अव्हेरला आणि तुमच्या वाढदिवशी त्यांनी केक नाही, तर दहशतवादीच पाठविले. बुलेट्स पाठविल्या. बॉम्बगोळे पाठविले. तुम्ही कितीही वेळा मैत्रीचे हात पुढे करा, त्यांच्यासोबत सेल्फी काढा. पाकिस्तान कधीच सुधारणार नाही. त्यांची अवलाद ही कुत्र्याचीच आहे. शेपूट वाकडे ते वाकडेच. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मला या प्रसंगी कायमच आठवतात. बाळासाहेब म्हणायचे, ‘तुम्ही कसेही वागा. पाकिस्तानला कितीही गोंजारा, कितीही कुरवाळा. ते तुमचे कधीही मित्र होऊ शकत नाहीत. अजिबात नाहीत.’ बाळासाहेबांचे विचार कायम लक्षात ठेवा… ते विचारच तुम्हाला कठीण समयी मार्ग दाखवतील.

(हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचे मत एेकण्यासाठी या लिंकवर क्लिक करा)

Tribute to slain soldiers

आज देशभरातून एकच मागणी होते आहे. ती म्हणजे पाकिस्तानवर तुटून पडा. त्यांना असा धडा शिकवा की पुन्हा त्यांची हिंमत होणार नाही, असे काही करायची. तर आणि तरच पाकिस्तानला अक्कल येण्याची शक्यता आहे. ज्या तरुण आणि युवा मतदारांच्या मतांमुळे भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली त्या तरुणांचा एकच आवाज आहे, पाकिस्तानला नेस्तनाबूत करा. ज्या सोशल मीडियाचा वापर करून भारतीय जनता पार्टीने निवडणुकीची रणनिती आखली, त्याच सोशल मीडियावर आज एकच मागणी आहे. मोदीजी, तुम्ही तुमचे शब्द करून दाखवा. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन दाखवा.

सोशल मीडियावर भारतीय जवानाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झालाय. त्यात एक कवितेचे सादरीकरण त्याने केले आहे…
अबकी चिंता मत कर चहरे का खोल बदल देंगे
इतिहास की क्या हस्ती है सारा भूगोल बदल देंगे
धारा हर मोड़ बदल कर लाहौर से निकलेगी गंगा
इस्लामाबाद की छाती पर लहराएगा तिरंगा
रावलपिंडी और करांची तक सब गारत हो जाएगा
सिन्धु नदी के आर पार सब भारत हो जाएगा
फिर सदियों सदियों तक जिन्नाह जैसा शेतान नहीं होगा
कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा
….
हिन्दुस्थान ने ली अब एक नई अंगड़ाई है
भारत माँ के चरणों में ये सोगंध हमने खायी है
आज नहीं तो कल हम अखंड भारत बनायेंगे
सिन्धु को फिर दुबारा गंगा से मिलाएँगे
बंग भंग हुआ था, पाप एक इस धरती पर
दुर्गा की भूमि को पुनः आजाद कराएँगे
खैबर पास और हिन्दुकुश भारत की सीमा होगी
चंहु ओर सनातन और केसरिये की जय जय कर होगी
ये स्वपन एक दिन जरुर साकार होगा
पर उस दिन कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा

csst02luaau7p4g

मोदीजी, ही कविता एका जवानाने म्हटली, असली तरीही १२० कोटी भारतीयांची ती भावना आहे. तिचा अपमान होईल, अशी कृती करू नका. हे सरकार आधीच्या काँग्रेस सरकारपेक्षा वेगळे आहे, हे दाखवून द्या…

आज नाही, तर कधीच नाही. आजच उत्तर देण्याची सुवर्णसंधी भारताला आहे. ही संधी साधली तरच जनतेला आपल्या शब्दांवर आणि आश्वासनांवर विश्वास राहील. मोदीजी, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊनच टाका… ही माझी नाही साऱ्या देशवासियांची मागणी आहे. त्यांनी तुम्हाला ज्यासाठी निवडून दिले त्यापैकी एक अपेक्षा पूर्ण करून दाखविण्याची संधी तुम्हाला आहे. तुम्ही पाकड्यांचे कंबरडे मोडून टाकाल, तर ते पुन्हा भारताच्या उंबरठ्यावर येण्याची हिंमत त्यांच्यात निर्माण होणार नाही. शेजाऱ्यांना तुम्ही असा धडा शिकवाल, हीच देशाची तुमच्याकडून अपेक्षा आहे…

त्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा…

3 thoughts on “मोदीजी, करून दाखवा

  1. Dada, can u sent this letter to PMO too..It could have more impact..and also convey same verbal communication along with Sena MPs.. article is good.

  2. दादा तुम्ही प्रत्येक भारतीयांच्या मनातले शब्द बोलला आहात. आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्याकडुन प्रत्येक भारतीयाची एवढीच माफक अपेक्षा आहे.

    आपण सारेच हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळसाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक आहोत.

    आपल्या देशात आपणच सुरक्षित नसलो तर विकास अन अच्छे दिन काय चाटायचे आहेत काय ?

    लाथ मारायला हवी पाकीस्तानला.
    भारतातील भाजप सरकारने पाकीस्तानला सडेतोड उत्तर नाही दिले तर आपणही लाथ मारूया ह्या अच्छे दिन वाल्या भाजप सरकारला.

Leave a reply to Yogesh Cancel reply