“कृतघ्नतेचा आजार जडलेली कंगना..!”

जगात कृतघ्न लोकांची अजिबात कमतरता नाही. हा आजार करोनापेक्षा महाभयंकर आणि घातक आहे. कृतघ्नता या आजाराचं मुख्य लक्षण म्हणजे आपल्याला ज्या व्यक्ती, संस्था, संघटना किंवा शहरानं नाव दिलं, संपत्ती दिली, प्रसिद्धी दिली, मानमरातब मिळवून दिला, लोकप्रियता दिली त्यांचे उपकार आपण विसरतो. आपण सेल्फमेड आहोत, असं उगाच वाटायला लागतं. अधूनमधून वेड्यासारखी वक्तव्ये करण्याची हुक्की येते. मानसिक आजार असल्यासारखी वर्तणूक व्हायला लागते. कृतघ्नतेचा आजार असलेल्या व्यक्तीला असंबद्ध बडबड करण्याची सवय जडते आणि मीडिया आपला टीआरपी वाढविण्यासाठी अशा बेताल बडबड्यांना प्रसिद्धी देतो. 

कृतघ्नतेचा विकार जडलेल्या एका व्यक्तीची आपल्याला नुकतीच नव्याने ओळख झाली. वास्तविक मला स्वतःला “क्वीन, तनु वेड्स मनू”, या चित्रपटातून उत्कृष्ट कलाकार म्हणून भावलेली ही अभिनेत्री…तीन राष्ट्रीय पुरस्कार जिच्या नावावर आहेत अशी सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून आपल्याला या व्यक्तीची ओळख होती. मात्र, नुकत्याच घडलेल्या काही घटना आणि वक्तव्यांमुळे अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील सभ्य, सुसंस्कृत आणि शालीनतेचा मुखवटा उतरला नी एका क्षणात असभ्य, असंस्कृत आणि बालीश बडबड करणाऱ्या कृतघ्न व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडले. 

अगदी बरोबर ओळखलंत तुम्ही, मी कंगना राणावत हिच्याबद्दलच बोलतो आहे. आज जागतिक हिंदी भाषा दिवस आहे. त्यामुळे कंगनाला अत्यंत समर्पक आणि चपखल ठरेल, अशी हिंदी भाषेतील एक म्हण वापरण्याचा मोह मला आवरता येत नाही. ‘जिस थाली में खाना उसी में छेद करना…’ म्हणजे आपल्यावर उपकार करणाऱ्याचे नुकसान होईल, त्याला फटका बसेल, अशा पद्धतीने वर्तन करायचे. कंगनाने तरी दुसरे काय केले ? कृतघ्नतेसाठी आणि नालायकपणासाठी सर्वाधिक मोठा पुरस्कार द्यायला झाला, तर तो कंगनालाच द्यावा लागेल.

आपल्या घरातून पळून महाराष्ट्रात नशीब आजमाविण्यासाठी आलेल्या कंगना नामक युवतीला मुंबईने सामावून घेतले. त्याच मुंबईबद्दल ही बाई कृतघ्नतेचा सूर आळवतेय. मुंबईने तिला नाव दिले, बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मान मिळवून दिला त्या मुंबईची तुलना तिने पाकव्याप्त काश्मीरशी केली. अग बये, तू जर पाकव्याप्त काश्मीरमध्ये असतीस तर तुला अभिनेत्री बनण्याची संधी मिळणं सोड, अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची संधी तरी मिळाली असती का ? याचा विचार कर. तुझी जीभ हासडून टाकली असती किंवा गायब करून तुझी हत्याही करण्यात आली असती. तुझा मृतदेहही सापडला नसता. मुंबईत आहेस म्हणून सुरक्षित आहेस इतकं लक्षात ठेव. 

अर्थात, कृतघ्नतेचा हा विकार कंगनाला आता जडलेला नाही. पहिल्यापासूनच ती कृतघ्नतेची शिकार आहे. अनेक मुलाखती पाहिल्या आणि वक्तव्ये ऐकल्यानंतर कंगनातील कृतघ्नतेचे दर्शन आपल्याला वारंवार घडते. मध्यंतरी एका मुलाखतीत कंगना म्हणाली होती, की तुम्हाला बॉलिवूडमध्ये सर्वोच्च स्थाना पर्यंत पोहोचायचं असेल, तर एखाद्या सुपरस्टार अभिनेत्याबरोबर लफडं करण्यात काहीच गैर नाही. आणि या बयेनं तसं केलंही… ही या कंगनाची लायकी. 

कंगना ही मधली काही वर्षे हृतिक रोशन या अभिनेत्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होती म्हणे. हृतिकचं लग्न झालेलं तरीही बॉलिवूडमध्ये बस्तान बसविण्याच्या उद्देशानं कंगनानं त्याला पटवलं. दोघांचं अफेअर सुरू झालं. अनेक वर्ष अफेअर चाललं होतं. परिणामी हृतिकचा घटस्फोट झाला. त्याची पत्नी सुझान त्याला सोडून गेली. गरज संपल्यानंतर कंगनानंही त्याला सोडलं. म्हणजे एकतर लग्न झालेल्या पुरुषाबरोबर अफेअर करायचं आणि गरज संपल्यानंतर कृतघ्नपणे त्यालाही सोडून द्यायचं.


हृतिक रोशन शिवाय आदित्य पांचोली, अध्ययन सुमन ह्यांच्याही आयुष्याचं ह्या बयेनं मातेेरं केलं. हृतिकला का सोडलं तिनं याचं काही ठोस कारण माहिती नाही. पण तो म्हणे ड्रग्ज घ्यायचा आणि त्यामुळं हिनं त्याला सोडचिठ्ठी दिली. बरं! ही बया काय धुतल्या तांदळासारखी आहे का? मुंबईत आल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे ही ड्रग्जच्या प्रचंड आहारी गेली होती, असं म्हणतात. अफू, चरस, गांजा, ब्राउन शुगर की आणखी काय घ्यायची देवाला माहिती. पण प्रचंड ड्रगच्या आहारी गेल्याचे आरोप होणारी कंगना हृतिकला का सोडते तर म्हणे तो ड्रग्जसेवन करतो म्हणून. आहे की नाही वेड्याचा बाजार…


टीव्हीवर बोलताना आणि सोशल मीडियावर व्यक्त होताना आज झाशीची राणी आणि शिवाजी महाराजांचं नाव घेणारी ही बया कधीकाळी व्याभिचारी नी आणि अमली पदार्थांचं सेवन करणारी गांजाडी होती, हे आम्ही विसरू शकत नाही. त्यामुळंच या महान व्यक्तिमत्त्वांचं नाव घेण्याचीही तिची लायकी नाही, हे मला आवर्जून नमूद करावंसं वाटतं. 


नशेमध्ये बोलते की काय समजायला मार्ग नाही.  पण काय म्हणते हि बया तर, “तुम्हास महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीचा इतका अभिमान आहे आणि इतक्या बढाया मारता तर मराठी भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांवर एक तरी चांगला चित्रपट झालाय का ?… अगं बये, तुला माहिती नाही पण भालजी पेंढारकर नावाचे एक महान दिग्दर्शक मराठीत होऊन गेले. त्यांची हयात गेली ऐतिहासिक चित्रपट तयार करण्यात. त्यांनी छत्रपती शिवरायांवर केलेले चित्रपट बघ आणि मग बोल. आमच्या महेश मांजरेकरनं मध्यंतरी केलेला चित्रपट बघितला तरी तुला कळेल महाराष्ट्रातील दिग्दर्शकांची ताकद काय आहे… काहीही माहिती न घेता बोलणं याला आमच्या मराठीत “उचलली जीभ लावली टाळ्याला”!

शिवसेना हा मा. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला पक्ष आहे. मा. बाळासाहेबांसोबत माँसाहेब सद्यस्थितीत मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासमवेत रश्मीवाहिनी यांनी ‘महिला आघाडी’च्या मार्फत सदैव महिलांच्या प्रश्नांकडे जातीने लक्ष दिले आहे. तुझ्या ज्या काही समस्या होत्या त्या शिवसेना या पक्षा इतक्या दुसऱ्या कोणत्याही पक्षामध्ये सोडविल्या जातील असे मला वाटत नाही. स्रियांचा सन्मान करण्याची आमची संस्कृती आहे. तू मात्र जिभेवरील नियंत्रण घालवून  परवा महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरी केला. अरे तुरे म्हणून त्यांना अवमानकारक बोललीस. बहुधा जुन्या सवयीनुसार काहीतरी नशा करून सोशल मीडियावर बाइट दिला का काय माहिती? हिमाचल प्रदेशातून मोठया तोऱ्यात बाईट दिलास, ती मी नऊ सप्टेंबरला मुंबईत येते आहे. काय उखाडायचं आहे ते उखाडा. आता मुंबई महापालिकेनं तुझ्या ऑफिसचं अनधिकृत बांधकाम उखडलं तर तुला इतकं चिडायला काय झालं… तू उखाड म्हटली आणि पालिकेनं उखडलं. काय चुकलं. मुंबई महापालिकेनं करून दाखवलं. आणि त्याचा संबंध महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी जोड्ण्याचं काय कारण… 

बहुमताने महाराष्ट्रात विराजमान झालेले आणि करोनाच्या महासंकटावर मात करण्यासाठी रात्रीचा दिवस करणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख तू एकेरी पद्धतीने करते, यातच तुझे संस्कार आणि प्रवृत्ती दिसते. त्यामुळेच महाराष्ट्राच्या सुसंस्कृत, सुशिक्षित आणि सभ्य मुख्यमंत्र्यांनी तुझ्या वक्तव्याला काडीचीही किंमत दिली नाही. तुझी लायकीच नाही ती. उद्धवसाहेब काही बोलणार नाहीत, पण शिवसैनिक तुझी मस्ती उतरवायला मागेपुढे पाहणार नाहीत. आज तुझं ऑफिस तोडलंय. त्यातून काय समजायचं ते समजून घे. उद्या काय करतील आणि कसा धडा शिकवतील, याचा तुला अंदाजही येणार नाही. मग फक्त सोशल मीडियावर बडबड करणंच तुझ्या हातात शिल्लक राहील
.

तिकडे मदन शर्मा नावाचा कोणीतरी एक निवृत्त नौदल अधिकारी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रसिद्ध करतो आणि मग फटके खातो. व्यंगचित्रात काय दाखवलं आहे, हे पाहिल्यानंतर शिवसैनिक का चिडले, याचा अंदाज आपल्याला येईल. एखाद्याचे आई-बाप बदलून दाखविणं हे कसलं व्यंगचित्र. हे तर विकृतचित्र. असं व्यंगचित्र काढणाऱ्याला आणि ते आक्षेपार्ह कॉमेंटसह प्रसिद्ध करणाऱ्याला फटकाविणार नाही तर काय करणार… मदनच्या समर्थनार्थ पुढे येणाऱ्यांचे आई-बाप बदलले आणि त्याचं चित्र काढलं तर चालेल का, हे आधी स्पष्ट व्हायला हवं.

आणि तो नौदलातील निवृत्त अधिकारी आहे म्हणून जे लोक बोंब मारतायेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. त्यानं ते व्यंगचित्र मदन शर्मा म्हणून प्रसिद्ध केलं होतं. नौदल अधिकारी म्हणून नाही. नौदलाला ते व्यंगचित्र मान्य आहे का ? हे मदनचा पुळका आलेल्यांनी पहिलं स्पष्ट करावं. नौदलात इतकी वर्षे राहून देखील ज्याला सार्वजनिकपणे काय शेअर करावं आणि काय करू नये, हे समजत नाही, त्या ठोंब्याबद्दल न बोललेलंच बरं. चूक स्वतः करायची आणि फटके पडले की नौदलाची ढाल पुढे करायची. हे धंदे बंद करा आणि एक लक्षात ठेवा ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. इथं चुकीला माफी नाही. फटके तर पडणारच. स्वतः झक मारायची आणि फटके पडले की शिवसेनेच्या नावानं रडायचं हा धंदा बंद करा. 

आमच्या नादाला लागू नका… शिवसेना आणि शिवसैनिकांच्या मनात वाघ असला आणि आमची वृत्ती वाघाची असली, तरीही घोडा हा आमचा आवडता प्राणी आहे हे लक्षात ठेवा…!!

निवडणुकीच्या तोंडावर नेतेमंडळी बैलगाड्यावर

दहा-दहा वर्षे गायब असलेले नेते झळकले फ्लेक्सवर

IMG_1894

लोकसभा निवडणूक जवळ आली, की सगळेच जण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी आसुसलेले असतात. कोणी दहा-बारा वर्ष गायब असतात आणि एकदम फ्लेक्सवर अवतरतात. तर कुणी अगदी निवडणुकीच्या तोंडावर शत्रूला जाऊन मिळतो आणि राजकीय रंगमंचावर अवतरतो. चार साडेचार वर्षे हे सर्व झोपलेले असतात आणि निवडणुकीच्या मोसमात समोर येतात. बेडकं परवडली किमान दरवर्षी पावसाळ्यात तरी दर्शन देतात. पण हे राकारणी फक्त निवडणूक ते निवडणूकच दिसतात. अशी ही निवडणुकीची गंमत आहे.

अनेकांना खासदार व्हायचे डोहाळे लागले आहेत. दहा-पंधरा वर्ष गायब असलेली मंडळी मला प्रश्न विचारत आहेत, की मी गेली पंधरा वर्ष काय केलं. मी काय केलं हे जनलेताल ठाऊकच आहे. पण तुमचं काय? तुम्ही लोकांसाठी काय केलं ते तरी कळू द्या लोकांना. लेकांनो, तुम्ही जर गेली पंधरा वर्षे राजकारणात सक्रिय असता, तर हा प्रश्न विचारायची वेळच आली नसती. फक्त डोळे उघडे ठेवले असते तरी तुम्हाला समजलं असतं.

जो उठतो तो मला प्रश्न विचारतोय. याचं काय केलं, त्याचं काय झालं. रेल्वे कधी सुरू होणार. बैलगाडा शर्यती कधी चालू होणार वगैरे वगैरे. सगळे प्रश्न मलाच. अर्थात, एक बरंय. शेवटी वर्गातही शिक्षक हुशार विद्यार्थ्याला किंवा जो उत्तर देऊ शकतो त्यालाच प्रश्न विचारतात. जो अभ्यासू आहे, ज्याचं वर्गात लक्ष आहे, तोच प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकेल, अशी खात्री शिक्षकांना असते. कदाचित माझ्याबाबतीतही तसंच असावं. सर्व समस्या सोडविण्यासाठी किंवा सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी शिवाजीराव आढळराव-पाटील हा एकमेव माणूसच योग्य आहे, असं लोकांना वाटत असावं. म्हणूनच ते माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती करत असावेत. विचारा हो कितीही प्रश्न… राजकीय हेतूने कितीही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करा. पण मी जनता जनार्दनाची मनःपूर्वक सेवा केली आहे. त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तर द्यायला मी तयार आहे. आतापर्यंत वेळोवेळी दिलेलीही आहेत आणि या पुढेही देईन. अर्थातच, मतदारराजाला.

निवडणूक जवळ आली, की सर्व जण तलवारी परजून तयार असतात. सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बैलगाडा शर्यती… हे असंय, की स्वतः काहीच करायचं नाही आणि जो प्रयत्न करतोय त्याला सारखं प्रश्न विचारून भंडावून सोडायचं. बरं गंमत बघा विधानसभा निवडणुकीच्या वेळी किंवा जिल्हा परिषद अथवा ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी बैलगाडा शर्यतींचा मुद्दा कधीच चर्चेत येत नाही. लोकसभा निवडणूक आली, बरोबर की वातावरण तापवायला सुरुवात होते. मला अडचणीत आणण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू होतात. विशिष्ट मंडळी खासदारांनी काय केलं, खासदारांनी काय केलं म्हणून हाकाटी पिटू लागतात. खरंतर बैलगाडा शर्यतीसाठी मी केलेल्या प्रयत्नांवर एक पुस्तक तयार होईल. इतके प्रयत्न मी केलेत. अनेकदा भाषणांमधून बोललो आहे. मुलाखतींमध्ये उत्तरं दिली आहेत. ब्लॉगही लिहिले आहेत. पण एकतो आणि वाचतो कोण? फक्त प्रश्न विचारण्यातच लोकांना रस.

बैलगाडा शर्यतींसंदर्भात लोकसभेत केलेले भाषण ऐकण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…

खरं तर मी सन २००२ पासून बैलगाडा शर्यतींसाठी लढा देतोय. त्यामुळे बैल, बैलगाडा आणिबैलगाडा शर्यती हा विषय कायमच माझ्यासाठी जिव्हाळ्याचा राहिलेला आहे. वास्तविक बैलगाडा मालकांच्या पाठीशी मी कायमच ठामपणे उभा राहिल्याने बैलगाडा शर्यतींचा विषय जिवंत राहीलाय. नाही तर या मंडळींनी तो कधीच निकालात काढला असता. लवकरच पाच न्यायमूर्तींच्या पूर्ण खंडपिठासमोर (फुल बेंच) ही सुनावणी होणार असून, यामध्ये तामिळनाडूतील जलिकट्टू, कर्नाटकातील कंबाळा आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती असे सगळेच एकत्रित प्रश्न या खंडपिठापुढे येणार आहेत. बैलगाडा शर्यती किंवा प्राण्यांचे साहसी क्रीडा प्रकार हा कोर्टासाठी जिव्हाळ्याचा किंवा अग्रक्रमाचा विषय नाही. त्यामुळे जेव्हा सवड असेल, तेव्हाच त्यावर सुनावणी होईल, असं कोर्टानं म्हटलंय. अर्थात, जेव्हा केव्हा सुनावणी होईल तेव्हा निकाल बैलगाडा शर्यतींच्याच बाजूने लागेल, असा मला विश्वास आहे.

001 Bailgada_PM Letter002 Bailgada_PM Letter

003_reply PM

बैलांसाठी सर्वप्रथम काढली विमा संघटना

बैलगाडा शर्यतीत बैलांच्या पायाला इजा, पाय मोडणे, शिंग मोडणे, बैल कायमचाच निकामी होणे असे प्रकार मी पाहिल्यावर महाराष्ट्रात पहिल्यांदा बैलगाडा विमा संघटना मी काढली. बैलगाडा मालकांकडून आम्ही फक्त शंभर रुपये ते पाचशे रुपये जमा करायचो आणि बैलाच्या इजा आ बैल निकामी झाल्यास त्याच्या मालकाला ४० ते ५० हजार रुपये आम्ही द्यायचो. यासाठी खुप वेळा मी खिशातूनच हे पैसे भरले हे सांगायलाही आजही अभिमान वाटतोय.

शर्यतीच्या घाटांसाठी खासदार निधी

पहिल्यांदा २००४ मध्ये मी खासदार झाल्यावर बैलगाडा घाटांसाठी खासदार निधी देणारा मी पहिला खासदार देशात ठरलोय. या निमित्ताने जुन्नर, खेड, शिरुर, आंबेगाव, भोसरी मतदार संघातील अनेक बैलगाडा घाटांच्या उभारणीत माझ्या योगाने होणा-या खासदार निधीचे योगदान संपूर्ण मतदारसंघ, मतदार आणि बैलगाड्यांचे मालक, बैलगाडा शर्यतींचे चाहते विसरलेले नाहीत.

बैलगाडा शर्यती बंद पाडण्याचे पाप काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची अवकृपा झाली अन राज्यात पहिल्यांदा सन २००५ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता काळात बैलगाडा शर्यती बंद पडल्या. याबाबत मी न्यायालयात गेलो आणि शर्यती पुन्हा २००६ मध्ये सुरू झाल्या. पुढे पाच वर्षे या शर्यती २०११ पर्यंत निर्विघ्नपणे सुरू  होत्या. मात्र सन २०११ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी एक अध्यादेश जारी करुन त्यात वाघ, सिंह, अस्वल, माकड आणि बैल यांचे प्रशिक्षण आणि प्रदर्शन यावर बंदी घातली आणि बैलगाडा शर्यती बंद झाल्या.

Dada arrest

आंदोलनाचे सर्वाधिक गुन्हे माझ्यावरच दाखल

बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात  म्हणून सन २००५ पासूनच्या प्रत्येक वेळीच्या आंदोलनात मी पुढे होतो आणि आहे देखील. या पुढेही मीच यामध्ये अग्रभागी राहणार हे लिहून ठेवा. बैलगाडा मालक माझ्याच नेतृत्वाखाली संघटित झाले. बंदी उठावी यासाठी कायदेशीर लढाई उभाण्यात मीच पुढाकार घेतला. बैलगाडा शर्यतीसंदर्भात आंदोलन छेडल्यामुळेच मी खासदार झालो, असा अनेकांचा गैरसमज. म्हणून ते देखील शर्यतींचे निमित्त करून झळकू लागले. कायद्याची भाषा अवगत नाही, कायदा समजत नाही, कायदा पाळण्यासाठी आणि लढण्यासाठी हे असतो हे अनेकांच्या गावीही नाही. मग काय लढणार ही मंडळी… फक्त सोशल मीडियावर झळकण्यासाठी आंदलनांचा फार्स करणार.

Bailgada dabhade dada copy

बैलगाड्यांसाठी मतभेदांना तिलांजली

मी बैलगाड्यासाठी काय करु शकतो याचा अनुभव सहा महिन्यांपूर्वी चाकणमध्ये दाखवून दिला. माझे राजकीय कट्टर विरोधक दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते यांच्यासह सर्वपक्षीय नेते-कार्यकर्त्यांना मी हाक दिली आणि एकाच व्यासपीठावर मी बैलगाडा शर्यतीं सुरू करण्याबाबतच्या लढाईचे रणशिंग फुंकले. पण लोक राजकीय मतभेद बाजूला ठेवून फक्त बैलगाडा शर्यतींसाठी एकत्र येऊ शकले नाहीत. दिलीप मोहिते वगळता कोणत्याही नेत्याने या व्यासपीठावर येण्याचे धाडस दाखविले नाही. राज्यव्यापी आंदोलनात दिलीप वळसे-पाटील, विलास लांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा इतर कोणताही मोठा नेता फिरकलाही नाही. आज मला प्रश्न विचारणारे लोक तेव्हा कुठे होते हा संशोधनाचाच विषय आहे.

Bail Gada SharyatBail Gada Sharyat 01

IMG-20150805-WA0014 (1)

बैलगाड्यांचा मुद्दा पहिल्यांदा लोकसभेत मांडला

लोकसभेत महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात असे ठणकावून सांगणारा पहिला खासदार मी आहे आणि याचा मला अभिमान आहे. पंत्रप्रधान नरेंद्र मोदींना भेटून बैलगाडा शर्यतींबाबत लोकसभेत निर्णय घ्या, असे सांगणारा देशातील पहिला खासदारही मीच आहे. शिवनेरीच्या छत्रछायेखाली जन्माला येवून राजा शिवछत्रपतींच्या नावाने जगताना सामान्य शेतक-याच्या जिव्हाळ्याच्या बैलगाडा शर्यतींसाठी कुणालाही नडायची ताकद ही फक्त माझ्यातच आहे हे मी वेळोवेळी दाखवून दिलेय. तामिळनाडूतील जलिकट्टूसाठी कमल हसन सह सर्व अभिनेते रस्त्यावर उतरतात आणि सरकारला तात्पूरता अध्यादेश काढून त्या चालू कराव्या लागतात हे तामिळनाडूचे वैभव. मात्र आपल्याकडे फक्त खासदार शिवाजीराव आढळराव यांनीच काय ते लढायचे आणि बैलगाडाशर्यती सुरू होण्याचे संकेत दिसू लागले की, सोशल मिडीयासह प्रत्येक ठिकाणी चमकायचे हे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे.

म्हणून माझे एकच सांगणे आहे की, राजकारण हा काही माझा धंदा नाही अन मला त्यातून काहीच कमवायचे नाही हे मी माझ्या तीन पंचवार्षिकमध्ये दाखवून दिले आहे. मात्र पहिल्या टर्मपासून बैलगाडा शर्यतींबाबतची लढाई मी एकट्याने सुरू केली त्यात कुणी तरी तात्पूरते येवून गेले आणि जात आहेत. मात्र बैलगाडा शर्यती सुरू होणे हे माझ्या बैलगाडा शौकीनांसाठी आणि बैलगाडा मालकांसाठी माझे स्वप्न असून ते मी पूर्ण करणारच आणि सर्वोच्च न्यायालय, लोकसभा आणि रस्त्यावरील लढाई मी जिंकणारच हे मी आवर्जून सांगतो. सुप्रीम कोर्टातील फुलबेंच समोर बैलगाडा शर्यतींसंदर्भात सुनावणी झाल्यानंतर निकाल आपल्याच बाजूने लागणार आणि पुन्हा एकदा बैलगाडा शर्यती सुरू होणार हा मला विश्वास आहे. कारण प्रत्येक टप्प्यावर कायदेशीर बाजू सक्षम ठेवण्याचे काम मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केलेले आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

जय महाराष्ट्र!!!

बैलगाडा शर्यतींसंदर्भातील जुने ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

ही लढाई माझी आणि माझीच… लढणार आणि जिंकणारही मीच…

अजित पवार तेव्हा कुठे होता तुम्ही?

भिर्रर्रर्र ऽऽऽ उचल की टाक…

ही लढाई माझी आणि माझीच… लढणार आणि जिंकणारही मीच…

bullock-cart-759
जून सुरू झालाय आणि जुलै येवू घातलाय आणि याच काळात सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठीची निर्णायक सुनावणीही होतेय. मात्र बैलगाडा शर्यतींचा विषय आलाय आणि मी बोलण्याआधी राजकारणातील कुणी बोललेय असे कधीच संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि अर्थातच महाराष्ट्रातही झालेले नाही. पर्यायाने एकीकडे जून-जुलैमधल्या पावसाळ्यातील ’कुत्र्यांच्या-छत्र्या’ उगवायला सुरुवात होईल आणि त्याच पध्दतीने याच काळात मी बोललोय म्हटल्यावर अनेक नाटकी बैलगाडाप्रेमी नेते-कार्यकर्ते मंडळीही बोलू लागतील हे माझ्यासाठी नेहमीचे चित्र.
खरं तर मी सन २००२ पासून बैलगाडा शर्यतींसाठी लढा देतोय. त्यामुळे बैल, बैलगाडा आणि बैलगाडा-शर्यती हा विषय नेहमीच माझ्यासाठी जणू श्वासच झालाय. अनेकांना असंच वाटतं आलंय की, मी बैलगाडा शर्यतींचा मुद्दा लावून धरलाय म्हणूनच खासदार झालोय आणि मग तेही असंच काहीसं करु लागतात. वास्तविक बैलगाडा मालकांच्या पाठीशी मी कित्येक वर्षे कायमच ठामपणे उभा राहिल्याने बैलगाडा शर्यतींचा विषय जिवंत राहिलाय. अन्यथा राजकरणातील काही तथाकथित नेते मंडळींनी बैलगाडा शर्यतींचा विषय कधीच ‘निकालात’ काढला असता. येत्या महिनाभरात सर्वोच्च न्यायलायात पाच न्यायमुर्तींच्या पूर्ण खंडपीठासमोर (फुल बेंच) निर्णायक सुनावणी होतेय. यात तामिळनाडूतील जलिकट्टू, कर्नाटकातील कंबाळा आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती असे सगळेच एकत्रित प्रश्न या खंडपिठापुढे सुनावणीसाठी येणार आहेत. अर्थात याच अनुषंगाने बैलगाडा शर्यती आणि त्या चालू-बंद होण्याच्या इतिहासात डोकवावं आणि आजच्या पिढीला हा इतिहास अवगत व्हावा म्हणून हे वास्तव मांडतोय.
Bailgada dabhade dada copy
महाराष्ट्रात बैलगाडा विमा संघटना काढणारा पहिला खासदार मीच
बैलगाडा शर्यती हे महाराष्ट्राचं आणि त्यातल्या त्यात माझ्या शिरुर लोकसभा मतदार संघाचं एक सोहळ्याचं रुप. याच सोहळ्याला आपल्यातीलच काही नतद्र्ष्टांची नजर लागली ती सन २००४-०५ च्या दरम्यान. खरं तर सन २००३-०४ चा काळ आठवा. त्याकाळी बैलगाडा शर्यतींबाबत कोण गंभीर होतं तर कुणीच नाही. माजी खासदार दिवंगत किसनराव बाणखेले यांना बैलगाडा शर्यतींमध्ये रस होता. त्यांच्यानंतर या विषयात स्वारस्य दाखवून माझा ’अजेंडा’ समजून मी काम केले. बैलगाडा शर्यतींबरोबरच बैलगाडा मालक आणि शौकिनांच्या प्रत्येक प्रश्नावरही मी काम केले आणि या प्रश्नी सातत्यही  ठेवले. खरं तर बैलगाडा शर्यतीत बैलांच्या पायाला इजा, पाय मोडणे, शिंग मोडणे, बैल कायमचाच निकामी होणे असे प्रकार मी अनेक स्पर्धांमध्ये पाहिल्यावर महाराष्ट्रात पहिल्यांदा ‘बैलगाडा विमा संघटना’ मी काढली. बैलगाडा मालकांकडून आम्ही फक्त शंभर रुपये ते पाचशे रुपये जमा करायचो आणि बैलाच्या इजा उपचाराबरोबरच बैल निकामी झाल्यास त्याच्या मालकाला ४० ते ५० हजार रुपये आम्ही द्यायचो. यासाठी खूप वेळा मी खिशातूनच हे पैसे भरले हे सांगायला मला आजही अभिमान वाटतोय. अर्थात अशा काही अफलातून कल्पनांमुळे बैलगाडा शर्यतींची लोकप्रियता अगदी जगात प्रसिध्द झालेल्या ‘पुणे-फेस्टीवल’ पर्यंत पोहचली आणि त्याचे निमित्त आपली एक पिढी आहे याचा मला अभिमान वाटतो.
DSC_0158
IMG_20171220_164228
बैलगाडा शर्यतींच्या घाटाला खासदार निधी देणारा देशातील पहिला खासदारही मीच
सन २००४ मध्ये मी पहिल्यांदा खासदार झाल्यावर ’बैलगाडा घाटांसाठी खासदार निधी’ देणारा मी पहिला खासदार देशात ठरलोय. या निमित्ताने जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरुर-हवेली मतदार संघातील अनेक बैलगाडा घाटांच्या उभारणीत माझ्या योगाने होणा-या खासदार निधीचे योगदान संपूर्ण मतदार संघ विसरलेला नाही. अशाच पध्दतीने बैलगाडा शर्यती ज्या पुणे जिल्ह्यात कधीकाळी एकदम भन्नाट-सुसाट अशा सुरू होत्या त्याच वेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची अवकृपा झाली अन राज्यात पहिल्यांदा सन २००५ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता काळात बैलगाडा शर्यती बंद पडल्या. याबाबत मी न्यायालयात गेलो अन शर्यती पुन्हा सन २००६ मध्ये सुरू झाल्या. पुढे पाच वर्षे या शर्यती २०११ पर्यंत अगदी निर्विघ्नपणे सुरू होत्या. मात्र सन २०११ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमधील तत्कालीन पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी एक अध्यादेश जारी करुन त्यात वाघ, सिंह, अस्वल, माकड आणि बैल यांचे प्रशिक्षण आणि प्रदर्शन यावर बंदी घातली आणि आपल्या बैलगाडा शर्यती बंद झाल्या.
अर्थात त्याच वेळी मी लगेच सर्वोच्च न्यायालयात पदरमोड करुन धाव घेतली आणि नामवंत वकिलांची फौज उभी केली. याचा परिणाम असा झाला की, संपूर्ण राज्यभरात फेब्रुवारी-२०१२ मध्ये बैलगाडा शर्यती पुन्हा जोमात सुरू झाल्या. मात्र आडकाठी आणणार नाही ते कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकार कसले हो..? मग पुन्हा एकदा तत्कालीन सरकारकडून आडकाठी आली आणि शर्यती बंद झाल्या. खरं तर बैल हा वरील रानटी प्राण्यांच्या गटात न मोडणारा आणि तुमच्या आमच्या घरातील एक कुटुंबसदस्य असणारा प्राणी. तर इतर प्राणी हे जंगली आहेत हे मी संसदेसह न्यायालयात सिध्द करण्यासाठी कायमच भांडत राहिलो. अर्थात केवळ बैलाला त्या जंगली प्राण्यांच्या यादीतून वगळले तरी आपल्या बैलगाडा शर्यती सुरू होणे शक्य आहे. मात्र संसद, सर्वोच्च न्यायालय आणि अगदी राजकीय व्यवस्था अशा सर्व स्तरावर आर्थिक ताकदीसह लढलो पण तोकडे यश आले आणि ७ मे २०१४ रोजी पुन्हा एकदा याच नियमाद्वारे बैलगाडा शर्यतींवर बंदी लादण्यात आली, तीच आजही कायम आहे.
Dada arrest
बैलगाडा शर्यतींवर सन २००५ पासून आंदोलने करुन गुन्हे दाखल होणारा एकमेव नेता मीच
बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात म्हणून सन २००५ पासूनच्या प्रत्येक वेळीच्या आंदोलनात मी पुढे होतो आणी आहेही. बैलगाडा मालक माझ्याच नेतृत्वाखाली संघटीत झालेत. बंदी उठावी यासाठी कायदेशीर लढाई उभाण्यात मीच पुढाकार घेतला आणि रस्त्यावरची आंदोलनेही केली. या आंदोलनांमध्ये बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी गुन्हा दाखल झालेला मी एकमेव नेता आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो. बैलगाडा शर्यती हा जसा माझा ‘श्वास’ झाला तोच ‘श्वास’ अनेकांनाही आकर्षित करु लागला आणि बैलगाडा शर्यतीच्या विषयामुळेच आपण खासदार होवू शकतो असे उगाचच कुणालाही वाटू लागले. कायद्याची भाषा अवगत नाही, कायदा समजत नाही, कायदा पाळण्यासाठी आणि लढण्यासाठी असतो हे अनेकांच्या गावीही नाही. अशाच काही उत्साही मंडळींमुळे कायद्याचीच भाषा करणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच मुंबईत नरिमन पॉईंटवर केलेल्या एका बैलगाडा-स्टंटला सामोरे जावे लागण्याचा प्रसंग महाराष्ट्राने अनुभवलाय आणि तो क्षण शेतकरी, बैलगाडा शर्यतींशौकीनांसाठी तितकाच वाईटही ठरला.
IMG_1661IMG_1894
बैलगाड्यांसाठी राजकीय जोडे बाजूला ठेवणाराही मीच
मी बैलगाड्यासाठी काय करु शकतो याचा अनुभव सहा महिन्यांपूर्वी चाकणमध्ये दाखवून दिला. माझे राजकीय कट्टर विरोधक दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, महेश लांडगेंसह सर्वपक्षीय नेते-कार्यकर्त्यांना मी फक्त बैलगाडा शर्यती सुरू होण्याच्या एकाच अजेंड्यासाठी हाक दिली आणि याच व्यासपीठावर मी बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबतच्या एकत्रित लढाईचे रणशिंगही फुंकले. अर्थात बैलगाडा शर्यती सुरू करण्याच्या नावाखाली काही मंडळी उगाच संघटीत होण्याचे चित्र तयार करतात याचे दु:ख खुप वेदना देते हेही आवर्जून सांगावेसे वाटते. अर्थात कुणातरी नेत्याला खुष करण्यासाठी, त्याच्या इशा-यावर चालणारी काही मंडळी ही पावसाळ्यातील कुत्र्यांच्या छत्र्यांसारखेच असतात हे मी गेल्या काही वर्षांच्या अनुभवात जवळून पाहिलेले आहे. अर्थात बैलगाडा मालकांकडील वर्गणी, वकील-शिष्ठमंडळांच्या नावाखाली विमानांच्या दिल्ली फे-या, दिल्लीत कुणी तरी नेता पकडून त्याचेबरोबर केलेले फोटो सेशन असा सगळाच खेळ शेतक-यांच्या भावनांशी खेळला गेला आणि जातोय हे या मंडळींच्या गावीही नसते आणि नाही हे विशेष.
vlcsnap-2015-12-25-17h13m01s255
बैलगाड्यावर पहिल्यांदा लोकसभेत बोलणारा पहिला खासदारही मीच!
लोकसभेत महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात असे ठणकावून सांगणारा पहिला खासदार मी आहे आणि याचा मला अभिमान आहे. पंत्रप्रधान नरेंद्र् मोदींना भेटून बैलगाडा शर्यतींबाबत लोकसभेत निर्णय घ्या असे सांगणारा देशातील पहिला खासदारही मीच आहे. शिवजन्मभूमी ‘शिवनेरीच्या छत्रछायेखाली जन्माला येवून राजा शिवछत्रपतींच्या नावाने जगताना सामान्य शेतक-याच्या जिव्हाळ्याच्या बैलगाडा शर्यतींसाठी कुणालाही नडायची ताकद ही फक्त माझ्यातच आहे,’ हे मी वेळोवेळी दाखवून दिलेय. तामिळनाडूतील जलीकट्टूसाठी कमलहसन सह सर्व अभिनेते रस्त्यावर उतरतात आणि सरकारला तात्पूरता अध्यादेश काढून तिथे बैलगाडा शर्यती चालू कराव्या लागतात हे तामिळनाडूचे वैभव. मात्र आपल्याकडे फक्त खासदार शिवाजीराव आढळराव यांनीच काय ते लढायचे आणि बैलगाडा शर्यती सुरू होण्याचे संकेत दिसू लागले की, सोशल मिडीयासह प्रत्येक ठिकाणी या ‘संधीसाधू-उपटसुंभांनी’ चमकायचे हे आपल्या पुणे जिल्ह्यातील शेतक-यांचे खरोखरीच दुर्दैव म्हणावे लागेल.
002 Bailgada_PM Letter001 Bailgada_PM Letter
003_reply PM
आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागे म्हणाले होते की, बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबतचे विधेयक विधानसभेत आणू आणि कायदा करु. मात्र हे विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे जावून त्यावर सही होताच त्यावर अजय मराठे नामक व्यक्तिने आक्षेप घेतले आणि कायदा झाला पण ’नियमावली कुठेय?’ असे म्हणत पुन्हा बैलगाडा शर्यतींपुढे अडचण आली. यावर उच्च न्यायालयाने याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडे हे प्रकरण सोपवल्याबरोबरच न्यायालयाने पाच सदस्यांचे पूर्ण बेंच यासाठी नेमले आणि त्याचीच सुनावणी येत्या महिनाभरात होईल. अर्थात यासाठी राज्याच्या वतीने लढण्यासाठी राज्याच्या कायदा व विधी विभागाशी मी नुकताच बोललो असून दिल्लीत राज्याच्या वतीने बाजु मांडणारे जे वकील आहेत त्यांचेकडे बैलगाडा शर्यती सुरू होतील अशा पध्दतीचे सर्व पूरावे व बाजु मांडण्यासाठीचे दस्ताऐवज पोहच झाल्याची खात्रीही आपण करुन घेतलेली आहे.
पहा कशी थट्टा, बरी नव्हे ही थट्टा..!
भाजपा सरकारने प्राणी कल्याण मंडळाच्या (अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड) अध्यक्षपदी खासदार पूनम महाजन-राव यांची नियुक्ती केलीय. अर्थात केंद्रातील एक मंत्री मनेका गांधी यांच्या सांगण्यावरुन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पूनम महाजन या सगळ्यांनी मिळून प्राणी कल्याण मंडळात ज्या जयसिन्हा यांची नियुक्ती केलीय ते जयसिन्हा म्हणजे ‘पेटा’चे (म्हणजेच बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी ज्या पेटा संघटनेचा तीव्र विरोध आहे त्यांचेच सदस्य असलेले हे गृहस्थ) सक्रीय सदस्य आहेत हे आपण सगळ्यांनी याचसाठी ध्यानी घ्यायला हवे. कारण या नियुक्तीने भाजपाच्या केंद्रापासून ते राज्यापर्यंतच्या सर्वच नेते-पदाधिका-यांची भूमिका किती (अ) प्रामाणिक आहे तेच लक्षात येतेय. मात्र बैलगाडा शर्यती-प्रेमी शेतक-यांची जयसिन्हांच्या नियुक्तीच्या निमित्ताने कशी थट्टा केली गेलीय ते आपण प्रत्येकासाठी लक्षवेधी आहे हे नक्की.
म्हणून शेवटी एकच सांगणे ते हे की, राजकारण हा काही माझा धंदा नाही अन मला त्यातून काहीच कमवायचेही नाही हे मी माझ्या तीन पंचवार्षिकमध्ये दाखवून दिलेय. मात्र माझ्या खासदारकीच्या अगदी पहिल्या टर्मपासून जी बैलगाडा शर्यतींबाबतची लढाई मी एकट्याने सुरू केली त्यात माझ्या सोबतीला आज पर्यंत कुणी सलगपणे टिकले असा एकही ‘हरीचा-लाल’ नाहीये. तरीही बैलगाडा शर्यती सुरू होणे आणि त्या चालू राहणे हे माझ्या बैलगाडा शौकीनांसाठी, सामान्य शेतक-यांसाठी आणि बैलगाडा मालकांसाठी माझे स्वप्न असून ते मी पूर्ण करणारच आणि सर्वोच्च न्यायालय, लोकसभा आणि रस्त्यावरील लढाई मी जिंकणारच हे मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो!
जय महाराष्ट्र!!!

मोदीजी, करून दाखवा

सारा देश तुमच्या पाठिशी आहे

491999-pm-modi-addresses-nation-on-independence-day-afp

कालपासून मन अस्वस्थ आहे. प्रचंड मानसिक त्रास होतोय. जम्मू-काश्मीरमधील उरी इथं लष्कराच्या तळावर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांकडून हल्ला होतो आणि त्यात भारताच्या एक-दोन नव्हे तर तब्बल १७ जवानांना वीरगती प्राप्त होते… हे सर्व जवान ‘ड्युटी’ संपवून आराम करण्यासाठी तळावर आलेले. तात्पुरत्या उभारलेल्या तंबूमध्ये ते विश्रांती घेत होते. स्फोटांनंतर हे तंबू देखील पेटतात काय आणि अवघ्या तीन मिनिटांमध्ये होत्याचं नव्हतं होतं काय. सारंच अनाकलनीय. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सतरा पैकी चौदा जवान आगीच्या तडाख्यात सापडले नि झोपेमध्येच त्यांना मृत्युने कवटाळले… हा सर्व घटनाक्रम कानावर आल्यापासून खूप खिन्न वाटतंय… मला वाटतं प्रत्येक देशभक्त भारतीयाची अवस्था माझ्यासारखीच झाली असावी. खोलवर कुठेतरी जखम झाल्यासारखी परिस्थिती आहे.

प्रत्येक वेळी पाकिस्तान कोणत्या ना कोणत्या मार्गाने येतो आणि भारताची कुरापत काढून निघून जातो. कधी त्यांचे सैनिक येतात. कधी त्यांच्या सैनिकांच्या गणवेशातील अतिरेकी. तर कधी अतिरेकी उघडपणे येऊन भारतीय तळांवर हल्ले करण्याचा प्रयत्न करतात. दुःख याचं आहे, की भारतात सध्या नरेंद्र मोदी यांचे सरकार असूनही अशा हल्ल्यांना प्रतिबंध झालेला नाही. मोदीजी, तुमच्याकडून देशवासियांना खूप अपेक्षा आहेत. त्यांना कठोर कारवाईचा दाखला द्या…

18jk3

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ कालपासून व्हायरल झालाय. ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात मोदीजी असं म्हणातात, की पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिले. फक्त निषेधाचे खलिते आणि इशाऱ्यांचे ई-मेल पाठवून काहीही उपयोग नाही. पाकिस्तानला लव्हलेटर पाठविणे बंद केले पाहिजे. ही मुलाखत झाली तेव्हा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नव्हते. फक्त गुजरातचे मुख्यमंत्री होते. मात्र, आता ते भारताचे माननीय पंतप्रधान आहेत. सर्व सत्ता आणि सूत्रे त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांनी फक्त निषेधाचे खलिते पाठवू नये. इशाऱ्यांचे ट्वीट करून शांत बसू नये. पाकिस्तानला असा धडा शिकवा मोदीजी, की पुन्हा त्यांनी आपल्याकडे वाकडा डोळा करून पाहता कामा नये.

(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…)

देशात माननीय अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना पाकिस्तन कुरापती काढायचा. डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या काळातही त्या सुरू होत्या आणि आता केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. कधी गुरुदासपूर तर कधी पठाणकोट. नि आता उरी. २७ जुलै २०१५ रोजी पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात भारतीय जवानांच्या वेषातील दहशतवादी घुसले आणि त्यांनी पोलिस ठाण्यावर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात पोलीस अधिक्षकासह चार पोलिसांना वीरमरण प्राप्त झाले. पठाणकोटचा हल्ला तर आणखीनच भयानक होता. दोन जानेवारी २०१६ रोजी म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीलाच पठाणकोट येथील एअरफोर्स स्टेशनवर दहशतवाद्यांनी हल्लाबोल केला. जवळपास सतरा तास सुरक्षारक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू होती. एकूण सहा जवान या हल्ल्यात हुतात्मा झाले. दोन वर्षांपूर्वी म्हणजे पाच डिसेंबर २०१४ रोजी उरी क्षेत्रातील मोहरा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दहा जवान शहीद झाले होते. या सर्वांवर कडी म्हणजे उरी येथे नुकताच झालेला दहशतवादी हल्ला…

cstfimkviaqfnus

मोदीजी, म्यानमारमध्ये घुसून आपल्या जवानांनी दहशतवाद्यांच्या खात्मा केला होता आणि मणिपूरमधील हल्ल्याचा बदला घेतला होता तेव्हा आम्हाला आपला खूप अभिमान वाटला होता. देशामध्ये खरोखरच बदल झालाय आणि ‘अच्छे दिन’ येण्यास प्रारंभ झालाय, असं वाटायला लागलं होतं. मात्र, असे जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये हल्ले झाल्यानंतर आपले प्रत्युत्तर काहीच नसतं, याची आम्हाला कायमच खंत वाटते. पठाणकोट येथील हल्ल्यानंतर आपले लष्करप्रमुख मा. दलबीरसिंग सुहाग म्हटले होते, की आम्ही कोणत्याही आव्हानासाठी तयार आहोत… म्हणजे काय ते सर्वांनाच चांगले कळते. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरही म्हटले होते, की आम्ही जशास तसे उत्तर देऊ. मागे एकदा ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वाचल्याचं आठवतं. पर्रीकर एका मुलाखतीत म्हणाले होते, की शत्रूकडून कुरापत काढली गेली, तर आमच्या जवानांचे हात बांधून ठेवलेले नाहीत. ते देखील शत्रूला योग्य ते उत्तर देतील. इतकंच काय तर सध्या भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा निवडणुकीपूर्वी म्हणाले होते, की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानी घुसखोर भारतात येण्याची हिंमतही करणार नाहीत. आता या सर्वांनी आपला शब्द खरा करून दाखविण्याची वेळ आली आहे.

पूर्वी मनमोहनसिंग सरकारवर कृतीशून्यतेचा आरोप व्हायचा. पंतप्रधान काहीच बोलत नाहीत आणि कृतीही करत नाहीत, अशी चौफेर टीका व्हायची. आता सरकार बदलले असले, तरीही मोदीजी आपल्याकडून पाकिस्तानला काहीच ठोस उत्तर दिले जात नाही. फक्त आंतरराष्ट्रीय न्यायालयात पुरावे सादर केले जातात. त्याचे पुढे काय होते कोणास ठाऊक? मोदीजी आम्ही आपल्यामध्ये कठोर कारवाई करणारा पंतप्रधान पाहतो. पाकिस्तानला धडा शिकविणारा आणि दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणारा राष्ट्रप्रमुख पाहतो आहोत. गुजरातमध्ये जसे तुम्ही मुख्यमंत्री असताना दहशतवाद्यांनी काणा डोळा करून पाहिला नाही. तशीच परिस्थिती तुम्ही भारताचे पंतप्रधान म्हणून निर्माण करावी, अशी अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून आहे. पाकड्यांना कायमचा धडा शिकवा आणि एकदाचा विषय मिटवून टाका.

modi-sharif-lahore

मध्यंतरी तर तुम्ही कमालच केलीत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवशी तुम्ही थेट पाकिस्तानमध्ये गेलात. शरीफ यांच्या घरी जाऊन त्यांना वाढदिवसाचा केक भरविलात. पण शरीफ हे त्याला जागले नाहीत. तुम्ही पुढे केलेला मैत्रीचा हात त्यांनी अव्हेरला आणि तुमच्या वाढदिवशी त्यांनी केक नाही, तर दहशतवादीच पाठविले. बुलेट्स पाठविल्या. बॉम्बगोळे पाठविले. तुम्ही कितीही वेळा मैत्रीचे हात पुढे करा, त्यांच्यासोबत सेल्फी काढा. पाकिस्तान कधीच सुधारणार नाही. त्यांची अवलाद ही कुत्र्याचीच आहे. शेपूट वाकडे ते वाकडेच. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मला या प्रसंगी कायमच आठवतात. बाळासाहेब म्हणायचे, ‘तुम्ही कसेही वागा. पाकिस्तानला कितीही गोंजारा, कितीही कुरवाळा. ते तुमचे कधीही मित्र होऊ शकत नाहीत. अजिबात नाहीत.’ बाळासाहेबांचे विचार कायम लक्षात ठेवा… ते विचारच तुम्हाला कठीण समयी मार्ग दाखवतील.

(हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचे मत एेकण्यासाठी या लिंकवर क्लिक करा)

Tribute to slain soldiers

आज देशभरातून एकच मागणी होते आहे. ती म्हणजे पाकिस्तानवर तुटून पडा. त्यांना असा धडा शिकवा की पुन्हा त्यांची हिंमत होणार नाही, असे काही करायची. तर आणि तरच पाकिस्तानला अक्कल येण्याची शक्यता आहे. ज्या तरुण आणि युवा मतदारांच्या मतांमुळे भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली त्या तरुणांचा एकच आवाज आहे, पाकिस्तानला नेस्तनाबूत करा. ज्या सोशल मीडियाचा वापर करून भारतीय जनता पार्टीने निवडणुकीची रणनिती आखली, त्याच सोशल मीडियावर आज एकच मागणी आहे. मोदीजी, तुम्ही तुमचे शब्द करून दाखवा. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन दाखवा.

सोशल मीडियावर भारतीय जवानाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झालाय. त्यात एक कवितेचे सादरीकरण त्याने केले आहे…
अबकी चिंता मत कर चहरे का खोल बदल देंगे
इतिहास की क्या हस्ती है सारा भूगोल बदल देंगे
धारा हर मोड़ बदल कर लाहौर से निकलेगी गंगा
इस्लामाबाद की छाती पर लहराएगा तिरंगा
रावलपिंडी और करांची तक सब गारत हो जाएगा
सिन्धु नदी के आर पार सब भारत हो जाएगा
फिर सदियों सदियों तक जिन्नाह जैसा शेतान नहीं होगा
कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा
….
हिन्दुस्थान ने ली अब एक नई अंगड़ाई है
भारत माँ के चरणों में ये सोगंध हमने खायी है
आज नहीं तो कल हम अखंड भारत बनायेंगे
सिन्धु को फिर दुबारा गंगा से मिलाएँगे
बंग भंग हुआ था, पाप एक इस धरती पर
दुर्गा की भूमि को पुनः आजाद कराएँगे
खैबर पास और हिन्दुकुश भारत की सीमा होगी
चंहु ओर सनातन और केसरिये की जय जय कर होगी
ये स्वपन एक दिन जरुर साकार होगा
पर उस दिन कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा

csst02luaau7p4g

मोदीजी, ही कविता एका जवानाने म्हटली, असली तरीही १२० कोटी भारतीयांची ती भावना आहे. तिचा अपमान होईल, अशी कृती करू नका. हे सरकार आधीच्या काँग्रेस सरकारपेक्षा वेगळे आहे, हे दाखवून द्या…

आज नाही, तर कधीच नाही. आजच उत्तर देण्याची सुवर्णसंधी भारताला आहे. ही संधी साधली तरच जनतेला आपल्या शब्दांवर आणि आश्वासनांवर विश्वास राहील. मोदीजी, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊनच टाका… ही माझी नाही साऱ्या देशवासियांची मागणी आहे. त्यांनी तुम्हाला ज्यासाठी निवडून दिले त्यापैकी एक अपेक्षा पूर्ण करून दाखविण्याची संधी तुम्हाला आहे. तुम्ही पाकड्यांचे कंबरडे मोडून टाकाल, तर ते पुन्हा भारताच्या उंबरठ्यावर येण्याची हिंमत त्यांच्यात निर्माण होणार नाही. शेजाऱ्यांना तुम्ही असा धडा शिकवाल, हीच देशाची तुमच्याकडून अपेक्षा आहे…

त्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा…

डोंगर… आपत्तीचा, दुःखांचा आणि आव्हानांचाही

माळीण… नुसता शब्द जरी नुसता कानावर पडला तरी काळजाचा थरकाप उडविणारी महाभयानक घटना डोळ्यासमोर उभी राहते. कधी काळी माळीण नावाचं छोटंसं टुमदार गाव इथं वसलेलं होतं, यावर कदाचित पुढच्या पिढीचा विश्वासही बसणार नाही, इतकी भीषण हानी या गावाची झाली आहे. कधीही भरून न येणारं नुकसान आहे. घटनेचं वर्णन करण्यासाठी भीषण आणि भयाण हे शब्द अपुरे पडतील, इतकी अवघड परिस्थिती आहे. अलिकडच्या काळात निसर्गाच्या रुद्रावताराचा मानवी जीवनाला बसलेला सर्वाधिक मोठा फटका म्हणजे माळीण असं मला वाटतं.  Satalite-image   10362619_10204072602993252_2135784327786748095_n

संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळं नवी दिल्लीत होतो. माळीणच्या दुर्घटनेची माहिती कळताच राजधानीतच महत्त्वाच्या गाठीभेटी घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. त्यांना दुर्घटनेची इत्थंभूत माहिती दिली. परिस्थितीची जाणीव करून दिली. माननीय पंतप्रधानांनी राजनाथसिंह यांना तातडीनं माळीणच्या दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात जाण्याच्या सूचना दिल्या.

10169176_10204643856439266_4879685879513590795_n

नवी दिल्लीत हे सगळं सुरू असताना माझं सगळं लक्ष माळीणकडे लागलं होतं. गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या काळात अनेकदा या गावात या ना त्या निमित्तानं जाणं झालं. माझा आणि माळीणचा अगदी ऋणानुबंध निर्माण झाला होता. तिथली परिस्थिती काय असेल आणि नेमकं काय झालं असेल, हे जाणून घेत होतो. मतदारसंघातील सर्व शिवसैनिक तसंच कार्यकर्त्यांना तातडीनं दुर्घटनास्थळी जाऊन मदतकार्याला हातभार लावण्याचे आदेश दिले. अर्थात, अनेक शिवसैनिक आदेशाची वाट न पाहता आधीच दुर्घटनास्थळी रवाना झाले होते. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते सर्वप्रथम माळीण गावात दाखल झाले होते. तेव्हा ‘एनडीआरएफ’चे जवान किंवा प्रशासनाचे अधिकारीही तिथं पोहोचले नव्हते. सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या परीनं मदतकार्य सुरू केले होते. शिवसैनिक आणि संघाच्या कार्यकर्त्यांचं मला खूप कौतुक आणि अप्रूप वाटतं. कोणतीही आपत्ती कोसळली, की मंडळीच सर्वाधिक आधी तिथं पोहोचतात आणि मदतकार्य सुरू करतात. दुपारनंतर ‘एनडीआरएफ’चे जवान माळीणमध्ये दाखल झाले. नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक आणि संघ स्वयंसेवक काम करू लागले.

1602098_868960169800569_1721092214454791634_o

नवी दिल्लीत वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांशी सातत्यानं माझी चर्चा सुरू होती. सतत कोसळणारा पाऊस, गावातील ठप्प झालेला वीजपुरवठा यामुळं रात्री दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देणं शक्य नव्हतं. त्यामुळं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही माळीणमध्ये दाखल झालो. केंद्रीय गृहमंत्री मा. राजनाथसिंह, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे आणि इतर काही नेतेमंडळी सोबत होती. राजनाथसिंह यांनी माळीण गावची परिस्थिती पाहिली आणि त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. ‘इथं एक गाव वसलेलं होतं, यावर विश्वासच बसत नाही,’ हे त्यांचं वक्तव्यामध्येच सगंळ काही सांगून गेलं. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळं राजनाथसिंह यांचं हृदयही हेलावलं. केंद्राच्या वतीनं तातडीनं दोन लाख रुपयांची मदत मृतांच्या नातेवाईकांना देण्यात येईल, याची त्यांनी घोषणा केली. त्याचप्रमाणं राज्यानं केंद्राकडे गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव पाठवावा. केंद्र त्यावर तातडीनं सकारात्मक निर्णय घेऊन गावाच्या पुनर्वसनाची मार्ग मोकळा करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं.

राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदल्या दिवशीच, म्हणजे दुर्घटनेच्या दिवशी येऊन परिस्थितीचा आढावा घेऊन गेले होते. मात्र, त्यांनी दुर्घटनाग्रस्तांना आणि मृतांच्या नातेवाईकांना कोणतीही मदत जाहीर केली नव्हती. काळाचा घालाच इतका महाभयानक होता, की आर्थिक मदत, दिलासा, मदतीचे हात या सगळ्यांच्या पलिकडं परिस्थिती पोहोचलेली होती. तरीही केंद्र सरकार आमच्या पाठिशी ठामपणे उभं आहे, असा विश्वास निर्माण करणं आवश्यक होतं. ते या निमित्तानं झालं. राजनाथसिंहांच्या नंतर दुपारी मग माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार दुर्घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या भेटीनंतर मग राज्यानं दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. अर्थात, राज्याच्या मदतीमध्ये ७५ टक्के वाटा केंद्राचाच असतो. त्यामुळं केंद्रानं माळीणच्या दुर्घटनाग्रस्तांसाठी भरभरून दिलंय आणि इथून पुढं देखील लागेल ती सर्व मदत करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, हे मी इथं आग्रहपूर्वक सांगू इच्छितो.

10499421_868962049800381_3891409029198393984_o

माळीणच्या दुर्घटनेमुळं कोसळलेला दुःखाचा आणि आव्हानांचा डोंगरच इतका मोठा होता, की त्याची कारणं काय, कशामुळं हे सगळं झालं, दुर्घटना नैसर्गिक की मानवनिर्मित या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची ती वेळ नव्हती. कदाचित अजूनही आपण चर्चा करण्याची ही वेळ नाही. भूवैज्ञानिक, पर्यावरणशास्त्रज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि संबंधित अभ्यासू मंडळी यावर सखोल संशोधन करून योग्य तो निष्कर्ष काढतील. आपण त्यामध्ये पडण्याची आवश्यकता नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. मात्र, तरीही विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी माळीण दुर्घटनेच्या निमित्ताने माझ्यावर निशाणा साधून टीका केलीच. मोगलांना जसे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी संताजी-धनाजी दिसायचे तसंच वळसे-पाटलांचं झालेलं दिसतंय. त्यांना प्रत्येक ठिकाणी शिवाजीदादाच दिसतो वाटतं.

विनाकारण त्यांनी माझ्यावर टीका केली. मला वादात पडायचं नाही. आणि दुर्घटनेच्या संकटामध्ये सापडलेल्या आपत्तीग्रस्तांचा अवमान करायचा नाही. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे, की पडकईची कामं करण्याला माझा विरोध नाही. मात्र, ही पडकईची कामं मनुष्यबळाच्या माध्यमातून झाली असती, तर ते अधिक योग्य झालं असतं.

Malin

आणखी एक मुद्दा मला इथं आवर्जून उपस्थित करावासा वाटतोय. खरं तर अशा आपत्तीच्या प्रसंगात दावे नि प्रतिदावे करत बसण्याची माझी इच्छा नाही. मात्र, समोरच्याला हे समजत नसेल तर मी तरी काय करणार. त्यामुळंच फक्त अजून एक उल्लेख करतो. माळीणच्या मदतीची माहिती घेण्यासाठी दुसऱ्यांदा जेव्हा मी तिथं गेलो तेव्हा डिंभे चेकनाका पास केल्यानंतर अडिवरे गावाजवळ पोलिसांनी माझ्या गाडीसह माझ्यासोबतच्या तीन गाड्या अडवल्या. नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल अरुण गिेरे हे माझ्यासोबत गाडीमध्येच होते. पोलिसांनी अरुण गिरे यांना गाडीतून उतरविले. मी माळीणला जाऊन परत येईपर्यंत अरुण गिरे यांना पोलिस बंदोबस्तात तिथेच म्हणजेच अडिवरे गावातच थांबवून ठेवण्यात आले. अरुण गिरे शिवसेनेत आल्याचा धसका दिलीप वळसे-पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. अरुण गिरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळं त्यांच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी अवघड परिस्थिती झालेली दिसतेय. त्यामुळंच ते प्रत्येक ठिकाणी सूडबुद्धी वापरत आहेत.

मला या पोलिसांचं मोठं आश्चर्य वाटतं. तुम्ही पोलिस आहात की राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधलेले शिपाई आहात? पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशावर तुम्ही चालता की दिलीप वळसे-पाटील यांच्या तालावर तुमचा कारभार चालतो? अरे, आंबेगावसह शिरूर मतदारसंघात कायद्याचे राज्य आहे की कुणा एकाची हुकुमशाही आहे? वेळीच सुधारा. राज्यातही पुढचं सरकार आमचं आहे आमचं.

बरं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आंबेगावात वेगळा न्याय लावण्याची पद्धत दिसतेय. एकीकडे शिवसैनिकांच्या आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गाड्या अडवायच्या. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चाळीस-चाळीस गाड्या कोणतीही तपासणी न करता आणि न अडविता सोडल्या जात आहेत. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीची, खासदाराची गाडी अडविण्याची हिंमत पोलिसांमध्ये येतेच कुठून? राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वेगळा न्याय आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना-कार्यकर्त्यांना वेगळा न्याय हा कोणता कायदा आहे, याचे उत्तर संबंधितांनी देण्याची आवश्यकता आहे.

‘पडकई’च्या चौकशीला वळसे-पाटील दचकतात का?

  • महाकाय यंत्रसामुग्री वापरून पडकईची कामं केल्यामुळंच ही दुर्घटना झाली का? याची चौकशी व्हायला पाहिजे.
  • अशी काय महाकाय आणि जागतिक दर्जाची यंत्रसामुग्री वापरली, की पडकईच्या कामांसाठी नऊ कोटी रुपये खर्च झाला, याचा तपास व्हायला पाहिजे.
  • पडकईचे नाव निघताच विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील एकदम दचकतात का? आणि बॅकफूटवर का जातात? त्यांचे पडकईच्या कामात काही हितसंबंध गुंतलेले आहेत का, यावर प्रकाश पडला पाहिजे.
  • अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय मगर हे माझी गाडी अडवून ‘पडकईबाबत बोलू नका. लोक नाराज होतील,’ असं मला सांगतात. काय बोलायचं आणि काय नाही, हे मला सांगणारे विजय मगर कोण. मुळात एका लोकप्रतिनिधीची गाडी अडविण्याचे अधिकार यांना कोणी दिले? काय बोलायचं आणि काय नाही, हे सांगणं पुढची गोष्ट झाली. कोणाच्या तालावर हे नाचताहेत? हा सगळा काय झोल आहे?
  • फक्त पोलिसांमार्फत नाही, तर सीआयडीच्या मार्फत पडकईच्या सर्व कामांची आणि या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे, अशी माझी ठाम मागणी आहे.

10556509_10204072604913300_2966336670619223850_n

पुनर्वसनाचे काम वेगाने व्हायला पाहिजे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. खचलेल्या मनांना आणि फक्त शरीरानं जिवंत असलेल्या गावकऱ्यांना सर्वतोपरी मदत करून पुन्हा उभं करण्याची आवश्यकता आहे. दुर्घटनेत वाचलेल्या नागरिकांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांचा निवास, भोजन, कपडे तसंच इतर सर्व गोष्टींची व्यवस्था ‘डायनालॉग इंडिया लिमिटेड’ कंपनी आणि ‘भैरवनाथ पतसंस्थे’मार्फत करण्यात येत आहे. गावातील पंधरा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी मी स्वतः उचलली आहे. शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं मदतनिधी कक्ष सुरू करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी पाच लाख रुपयांचा मदतनिधी उभा राहिला. त्यानंतर मदतीचा ओघ सुरूच आहे. कपडे, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या रुपानेही मदत मोठ्या प्रमाणावर येते आहे.

दुर्घटनेमुळं झालेलं नुकसान आणि कोसळलेला दुःखाचा डोंगर यातून आपल्याला पुन्हा उभं रहायचं आहे. गावकऱ्यांना उभं करायचं आहे. त्यांना सहकार्याचा हात द्यायचा आहे. आपण सर्वांनी शिवसेनेच्या मदतकेंद्राला भरघोस मदत करून माळीण गावाच्या विकासासाठी आणि आपत्तीग्रस्तांना पुन्हा उभं करण्यासाठी हातभार लावावा, ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. लिहिण्यासारखं बरंच आहे. पण आता इथंच थांबतो. पुन्हा भेटू लवकरच…